गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (12:33 IST)

महाराष्ट्रात डेंग्यु-चिकुनगुनियात तिपटीने वाढ

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. साधे आजार असले तरी अंगावर काढू नये. ज्येष्ठांसह चिमुकल्यांत सर्दी, खोकला, तापाच्या तक्रारी वाढताहेत. याशिवाय महाराष्ट्रात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे अनेक शहरात रुग्णालयात रुग्णांची गर्दी होत आहे.
 
एकीकडे व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे. दुसरीकडे डेंग्यूने डोके वर काढले आहे. पावसाने सर्दी, खोकला, तापाची रुग्णसंख्या वाढत आहे. पावसात भिजणे टाळले पाहिजे. ताप तीन दिवसापेक्षा जास्त दिवस राहत असेल तर तत्काळ आवश्यक असलेल्या टेस्ट तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करून घेणे उचित ठरेल, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. पिण्याचे पाणी उकळून निजंर्तुक केल्यानंतर मुलांना द्यावे, थंड पदार्थ टाळावे. अस्वच्छ असलेल्या परिसरात जाणे टाळावे. दरम्यान, आजार अंगावर काढू नका, कोरानासह इतरचाचण्या करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.