शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (09:08 IST)

जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन करु - मुख्यमंत्री

जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन करु असं ट्वीट युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव मधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिवसेना-भाजपमधील 25 वर्षांची युती तोडल्याचं जाहीर केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही ट्वीट करुन युतीबाबत  मत नोंदवलले आहे. मुख्यमंत्र्यांनी  ट्वीटमध्ये ”सत्ता हे साध्य नाही, तर साधन विकासाचे. पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र. जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय परिवर्तन तर होणारच.” असे म्हणले आहे.