बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 मे 2017 (11:17 IST)

मुख्यमंत्र्यांसोबत झालेली बैठक निष्फळ, शेतकरी १ जूनपासून संपावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणतांब्यातील शेतकऱ्यांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली. 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी किसान क्रांती शेतकरी संघटना आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वाटाघाटी झाल्या. मात्र चर्चेने समाधान झालं नाही. कर्जमाफीची मागणी कायम ठेवली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे, मात्र त्याने समाधान झालेलं नाही. त्यामुळे 1 जूनपासून शेतकरी संपावर जातील. गावात जाऊन त्याची तयारी करु, अशी माहिती शेतकऱ्यांनी बैठकीनंतर दिली. त्यामुळे आता अनेक शहरात उद्यापासून भाजीपाला, दूध आणि दैनंदिन आवश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू शकतो.