शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (07:59 IST)

.नाशिक मनपा निवडणुकी साठी महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील

आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने शिवसेना व कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मात्र काही पक्ष सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत, त्यांनी स्वबळावर जावं असे सूचक विधान राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
 
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी भुजबळ कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. . त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले कि, शक्यतो मविआ चे सर्वोच्च नेते यांचे मत एकत्र निवडणूक लढण्याचे आहे, एकनाथ शिंदे यांनी देखील एकत्र लढण्याबाबत विचारणा केली, मात्र काही पक्ष सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत, त्यामुळे कुणाला वाटत असेल स्वबळावर जावं तर तो त्यांचा प्रश्न आहे, नाही झालं तर निवडणुकीनंतर एकत्र येता येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
 
आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्ही स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन तयारी करण्याच्या सूचना केल्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे सगळे मतदार संघ लढवण्याच्या दृष्टीने आपली तयारी पाहिजे, मविआचे जे पक्ष सन्मानाने आमच्या सोबत बसतील आणि चर्चा करतील त्यांच्याशी चर्चा करून कोणा सोबत जायचे हे ठरविण्यात येईल. आम्ही आमचे दरवाजे उघडे ठेवले असून आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
 
गोपीचंद पडळकर यांच्या आगपाखड
 
यावेळी भुजबळांनी पडळकरांवर निशाणा साधत आगपाखड केली. ते म्हणाले कि, पवार साहेबांची एलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही, ज्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत आहे, असे फक्त शरद पवार आहेत. पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांना लोकांच्या संबंधात काळजी वाटण स्वाभाविक आहे. त्यामुळे पवार साहेब एसटी कामगारांच्या प्रश्नाबाबत त्यांनी बैठक घेतली. प्रश्न सुटत नसतील, तर मविआ ची प्रश्न सोडवण्याची सामूहिक जबाबदारी आहे.