शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (20:21 IST)

सिद्धार्थच्या 'त्या' ट्वीटवर सायना नेहवालच्या वडिलांची नाराजी, जाहीर माफीची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा राजकारण आणि न्यायालयीन लढाईतून आता सोशल मीडियापर्यंत पोहोचला आहे. तिथेही या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद थांबताना दिसत नाहीये.
आताचा वाद हा अभिनेता सिद्धार्थ याने ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू सायना नेहवालच्या कमेंटवर केलेल्या ट्विटविषयी आहे.
या ट्वीटवर आता सायना नेहवालच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी अभिनेता सिद्धार्थं जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. सायनाचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना ही मागणी केली.
त्यांनी म्हटलं की, चित्रपट क्षेत्रातील एका व्यक्तीने (अभिनेता सिद्धार्थ) ट्वीटरवर सायना नेहवालवर वाईट शब्दांत टिप्पणी केली होती. मी त्यांच्या त्या टीकेची निंदा करतो. त्यांनी समोर येऊन जाहीररित्या माफी मागायला हवी. आमचं कुटुंब या गोष्टीमुळे खूप दुखावलं आहे. सायनासुद्धा नाराज आहे.
 
सायनानं मोदींच्या पंजाबमधील ताफ्यात झालेल्या सुरक्षेच्या त्रुटीबाबत चिंता जाहीर केली होती.
"जर पंतप्रधानांच्याच सुरक्षेत त्रुटी राहात असेल, तर तो देश स्वतः सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. उपद्रवी लोकांकाडून पंतप्रधान मोदींवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते," असं सायनानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
त्यावर सिद्धार्थ जे उत्तर दिलं, त्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे.
 
सायनाच्या या ट्विटला रिट्वीट करत अभिनेता सिद्धार्थनं म्हटलं, "सटल कॉक चॅम्पियन ऑफ़ द वर्ल्ड...आपल्याडे भारताचे संरक्षक आहेत, याचा आनंद आहे. रिहाना, तुझी लाज वाटते."
जानेवारी 2020मध्ये सायनानं भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे.
गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना हिने गेल्यावर्षी भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत ट्वीट केलं होतं. त्यानंतर भारताकडून अनेक सेलिब्रिटींनी सरकारची बाजू उचलून धरत रिहानावर भारताच्या अंतर्गत प्रकरणात नाक खुपसल्याचा आरोप केला होता.
गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना हिने गेल्यावर्षी भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत ट्वीट केलं होतं. त्यानंतर भारताकडून अनेक सेलिब्रिटींनी सरकारची बाजू उचलून धरत रिहानावर भारताच्या अंतर्गत प्रकरणात नाक खुपसल्याचा आरोप केला होता.
सिद्धार्थ यांच्या ट्विटमधील रेहानाचा उल्लेख बाजूला ठेवला, तरी महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना त्यांची कमेंट पसंत पडली नाहीये.
 
"या माणसाला एक-दोन गोष्टी शिकवायला हव्यात. ट्विटरवर अद्याप या व्यक्तीचं खातं सक्रिय का आहे? संबंधित पोलिसांच्या निदर्शनास हा मुद्दा आणून देत आहोत," असं रेखा शर्मा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सिद्धार्थ यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ जो काढला जातोय, तसं मला म्हणायचं नव्हतं, असं सिद्धार्थनं म्हटलं आहे.
 
सिद्धार्थनं म्हटलं, "एक रचलेली कथा (cock and bull- इंग्रजीतली म्हण) हाच याचा संदर्भ आहे. दुसऱ्या प्रकारे यचा अर्थ लावणं चुकीचं आहे. कुणाचा अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता. ना माझी भावना तशी होती. थांबतो."
 
सिद्धार्थच्या या ट्विटनंतर सायनानेही आपली बाजू स्पष्ट केली आहे.
तिनं म्हटलं, "त्यांच्या म्हणण्याचा अर्थ नेमका काय होता, ते मी ठोसपणे सांगू शकत नाही. पण, मला ते अभिनेता म्हणून आवडत होते. त्यांनी जे म्हटलं ते मला आवडलेलं नाहीये. ते अजून चांगल्या पद्धतीनं त्यांचं म्हणणं सांगू शकत होते.
 
पण, ट्विटरवर अशापद्धतीनं बोललल्यास आपण लोकांच्या नरजेत येतो, असं मला वाटतं. प्रश्न भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेचा आहे."
 
रेखा शर्मा यांच्या ट्वीटनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनदेखिल या प्रकरणी भूमिका मांडण्यात आली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याच्या आणि चौकशीच्या मागणीसाठी पत्र लिहिलं आहे.
 
ट्विटर इंडियाकडेही अॅक्टर सिद्धार्थचं अकाउंट ब्लॉक करण्याची आणि अशी कमेंट केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली असल्याचं महिला आयोगानं निवेदनात म्हटलं आहे.
 
मात्र ट्विटरवर काही जणांनी याला भाजपचं 'टूलकिट' म्हटलं आहे. तसंच सायना नेहवाल केवळ त्यावर अंमलबजावणी करत होत्या, असं म्हटलं आहे.
फिल्ममेकर राकेश शर्मा यांनी सायना नेहवालला उत्तर दिलं आहे.
 
"पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप कट-पेस्ट टूलकिटनं काम केलं? कोणीही त्यांच्यावर हल्ला केला नव्हता. काही पोस्ट करण्याआधी एकदा तो व्हीडिओ पाहा. त्याठिकाणी घोषणाबाजी करत असलेल्या गर्दीच्या हातात भारतीय जनता पार्टीचे झेंडे होते. ते त्यांचे समर्थक होते. सुश्री नेहवाल तुम्हाला अंध भक्त बनताना पाहून दुःख होत आहे."
 
दरम्यान, सोशल मीडियावर सायना नेहवाल यांच्या बाजुनंही अनेक लोक मतं मांडत आहेत.
आध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे सदगुरू यांनी म्हटलं आहे की, सायना नेहवाल देशाच्या गौरव आहेत, असं म्हटलं आहे. ही अभद्र प्रतिक्रिया आहे. आपण सार्वजनिक चर्चा कोणत्या दिशेला नेत आहोत.
"एखाद्या सिनेस्टार आणि स्पोर्ट्स पर्सन यांच्यातून एकाला निवडायचं असेल, तर मी स्पोर्ट्स पर्सनची निवड करेल. सायना नेहवाल एक अचिव्हर आहेत आणि लाखो भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत," असं विवेक यांनी लिहिलं.
"ट्विटर इंडिया आणि पराग अग्रवाल अॅक्टर सिद्धार्थ यांच्या विरोधात कटोर कारवाई करतील, अशी आशा आहे. या प्रकारच्या लोकांना ट्विटरच्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची वेळ आली आहे," असं अभिजीत राव यांनी लिहिलं.