शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

वाहनांमध्ये लहान मुलांसाठी खास सीट असावे

वाहनांमधील आसन (सीट) हे प्रौढ प्रवाशांच्या आकाराची असतात. सुरक्षेच्या उपाययोजनाही त्यांच्याच सोयींची असतात. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी वेगळी व्यवस्था राहत नाही. परिणामी, अपघात झाल्यास मोठ्यांच्या तुलनेत लहान मुले लवकर गंभीर जखमी होतात. यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही मोठे असते. म्हणूनच प्रत्येक वाहनांमध्ये लहान मुलांचे आसन व त्यांच्या सुरक्षेची विशेष व्यवस्था असणे आवश्यक आहे. किंबहुना सर्व देशांनी वाहनांमध्ये चाईल्ड सीट्स अत्यावश्यक कराव्यात, असे आवाहन, टोरण्टो कॅनडा येथील प्रसिद्ध अस्थीरोग विशेषज्ञ डॉ. अ‍ॅण्ड्रयू हॉवर्ड यांनी येथे केले. 
 
विदर्भ आॅर्थोपेडिक असोसिएशनतर्फे पेडियाट्रीक आॅर्थोपेडिक सोसायटी आॅफ इंडियाच्या २३व्या ह्यपॅसिकॉन-२०१७ह्ण या राष्ट्रीय बालअस्थीव्यंग परिषदेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.