सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (15:53 IST)

फडणवीस यांचे निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर गंभीर आरोप

विरोधी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अजून पेन ड्राइव्ह बॉम्ब टाकला असून त्यांनी मुंबईचे सेवा निवृत्त अधिकारी आणि एनकाऊंटर तज्ञ इसाक बागवान यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमावल्याच्या आरोप केला आहे. तसेच बागवान यांच्याविषयीचं स्टिंग ऑपरेशन केल्या असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. गुरुवारी विधानसभेत बोलत असताना त्यांनी हा पेनड्राइव्ह बॉम्ब राज्य सरकार  वर टाकला . देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना पेनड्राइव्ह मध्ये इसाक बागवान यांचे बंधू नासिर बागवान यांचं स्टिंग असल्याचं सांगितलं. इसाक बागवान यांचं बारामती कनेक्शन असल्याचं म्हटलं . ते सेवेत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केल्याचं फडणवीस यांनी म्हटले आहे.