रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2017 (16:50 IST)

गावितांवर भ्रष्टाचाराचा ठपका, मंत्रीपदाची संधी हुकण्याची शक्यता

राज्य सरकारने नेमलेल्या एम जी गायकवाड समितीच्या अहवालात माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावितांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. 2004 ते 2009 या काळात आदिवासी विकास योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समितीच्या चौकशीत निष्पन्न झालं आहे. त्यामुळं फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारात डॉ.गावितांचं संधी हुकण्याची शक्यता आहे. आदिवासी विकास विभागात 6 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याबाबतच्या चौकशीत तत्कालिन आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या आदेशामुळे सरकारला 3 कोटी 90 लाख रुपयांचा फटका बसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.