1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जून 2023 (12:06 IST)

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. मानाचे वारकरी दांपत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत महापूजा केली गेली.
 
तसेच मानाचे वारकरी दांपत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत सांगितले.
 
जनसेवेचा जो वसा माझ्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे तो असाच पुढे नेण्याचे बळ मला मिळावे एवढीच इच्छा मनोमन त्याच्याकडे व्यक्त केली.
महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
ते म्हणाले की बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्यांच्यावरचे अरिष्ट दूर होऊन पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत अशी त्यांनी प्रार्थना केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंढरीचं परिसर पांडुरंगमय झाला असून आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. म्हणून तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे विठ्ठल पुजेसारखेच आहे.
 
सलग दोन वर्षे आपल्याला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळणे हे आपले भाग्य असल्याचे ते म्हणाले. 

Photo Credit: CM Eknath Shinde Twitter