शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (17:16 IST)

10 महिन्यांच्या चिमुकल्या नातीला वाचवण्यासाठी आजोबानी केलं यकृत दान

नागपूर येथे दहा महिन्यांची चिमुकली क्रिग्लर-नाजर सिंड्रोम नावाच्या एका दुर्मिळ आजाराने जन्मतः ग्रस्त असून डॉक्टरांनी तिचे वय दोन वर्ष सांगितले .यकृताला पित्त खंडित होण्यापासून रोखले. काविळच्या आजारामुळे रंग फिकट झाला असून मुलीची प्रकृती खालावत होती.हा दुर्मिळ आजार 1 दशलक्ष मुलांपैकी एखाद्याला आढळतो.

हा आजार या चिमुकलीला झाला होता. तज्ञांनी चाचणी करून यकृत प्रत्यारोपणाचे सांगितले. चिमुकलीचा रक्तगट आईच्या रक्तगटाशी जुळत नसल्याने आता पुढे काय करावं असा प्रश्न कुटुंबीयांपुढे आला. अशा परिस्थितीत आजोबांनी आपल्या यकृताचे काही भाग नातीला दान करण्याचे ठरविले आणि नागपूरच्या किम्स किंग्सवे रुग्णालयात जिवंत दात्याचे यकृत प्रत्यारोपित करण्यात आले. 
 
या बाळाचे वजन कमी असल्यामुळे डॉक्टरांपुढे ही शस्त्रक्रिया आव्हानत्मक होती. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल दहा तास लागले. डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. आजोबांनी यकृतचे दान दिल्यामुळे या चिमुकलीला नवीन जीवन मिळालं आहे.   









Edited by - Priya Dixit