बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 डिसेंबर 2020 (10:54 IST)

बाप्परे, महादेव प्रसन्न होईल या धारणेतून स्वतः चा गळा चिरला

पैठण शहरात एका युवकाने महादेव प्रसन्न होईल या वेड्या धारणेने स्वतः चा गळा चिरून महादेवाच्या पिंडीला रक्ताने अभिषेक घालत जीवन संपविल्याचा प्रकार समोर आला आहे. नंदू घुंगासे (वय २५) असे युवकाचे नाव आहे.   
 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, नंदुची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यातच वडीलांचे काही वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आली. नंदुचा मोठा भाऊ बेफिकिर वृत्तीने वागत असल्याने नंदुवरच सर्व भार पडला. भावानेही कामधंदा करावा, असे त्याला वाटत होते. मोठ्या भावाला पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणच्या महादेवाच्या दर्शनास नेल्यास भाऊ चांगला होईल, असे कोणीतरी सुचविले. त्याप्रमाणे त्याला दर्शनाला नेऊन आणले. त्यानंतर भावाच्या वागणुकीत फरक पडल्याचे जाणवले, महादेव आपल्या जीवनात काहीही करू शकतात ही अंधश्रद्धा नंदुच्या मनात दृढ झाली. त्यातून हे कृत्य केल्याचे पाेलिसांनी सांगितले.