शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (16:40 IST)

सप्तश्रृंगी गड : बोकडबळी प्रथा बंद

साडे तीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गडावर अनेक वर्षांपासून चालत आलेल्या बोकडबळी प्रथेला फाटा देत ही प्रथाच बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे.

या मोठ्या निर्णयाचं अनेक स्तरावरुन स्वागतही होत आहेत.  गेल्या वर्षी एका दुर्घटनेत गडावरचे १२ भाविक जखमी झाले होते, त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला. बोकडबळी प्रथेनंतर मानवंदना देण्याची प्रथा आहे. त्यात हवेत केलेल्या गोळीबारात गडावरचे १२ भाविक जखमी झाले होते. त्यामुळे ही प्रथाच बंद करण्याच निर्णय घेतला गेला. सप्तश्रृंगी मंदिर परिसरात दिल्या जाणाऱ्या बोकडबळीवर बंदी घालण्यात आली असली तरी भाविकांमार्फत वैयक्तिकरित्या होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी नाही. पण मंदिर परिसरात बंदी कायम राहील.