शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 जानेवारी 2023 (21:19 IST)

चौकशी होईपर्यंत मी काही बोलणार नाही : तांबे

पदवीधर मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार सुधीर तांबे यांचे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने हायकमांडने निलंबन केले आहे.  यावर  सुधीर तांबे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले आहेत, चौकशी होईपर्यंत मी काही बोलणार नाही, मला जर पक्ष श्रेष्ठींनी बोलावलं, तर मी भूमिका मांडायला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 
 
यावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही, मला याबद्दल काहीही बोलायचं नाही, चौकशी होईपर्यंत मी काही बोलणार नाही, मला जर पक्ष श्रेष्ठींनी बोलावलं, तर मी भूमिका मांडायला जाईल’ असे तांबे यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच आता मी पक्षाविषयी काहीही बोलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
 
पितापुत्रांच्या घडामोडीनंतर भाजपशी त्यांची जवळीक वाढत असल्याचे चित्र होते. त्यामुळे  तांबे हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना सुधीर तांबे यांनी पूर्णविराम दिला असून ते म्हणाले, मी भाजपा मध्ये जाणार, ही चर्चा खरी नाही, आम्ही भाजपाला पाठिंबा मागितला नाही असे तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor