बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (15:33 IST)

भोंगे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच : राज ठाकरे

raj thackeray
राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन पुकारले आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्यांची धरपकड करण्यात येत आहे. याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. 92 टक्के ठिकाणी अजान बंद झाली. तर काही ठिकाणी 5 वाजायच्या आत लागली. काही ठिकाणी कमी आवाजात झाली. पोलीस 5 वाजायच्या आत अजान झाली त्यावर कारवाई करणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. लोकांना जो त्रास होत होता, तो कमी होईल. हा विषय श्रेय लाटण्याचा नाही. लोकांचा त्रास कमी होणं आहे. मशिदींवर भोंगे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा दिला आहे.
 
अनधिकृत भोंगे वाजवणाऱ्या मशिदींवर कारवाई केली पाहिजे. 35 मशिदींवर कारवाई केली पाहिजे. अनधिकृत भोंग्याना परवानगी कशाला दिली गेली आहे. यांनीही रोजच्या रोज परवानगी मागीतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे झाले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.  हा विषय आजचा नाही तर तो कायमचा आहे. हा धार्मिक विषय नाही. धार्मिक वळण दिलं तर आम्हीही तसंच करु, असा स्पष्ट इशारा राज यांनी यावेळी दिला. भोंगा वाजला तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागणारच. पोलिसांनी भोंग्यावर कारवाई केली पाहिजे. जर हे थांबले नाही तर पुन्हा उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.