शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जुलै 2023 (18:06 IST)

Jejuri : सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय,जेजुरीतील राष्ट्रवादीचे नेते मेहबूब पानसरे यांची निर्घृण हत्या

murder
जेजुरी नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगर सेवक मेहबूब पानसरे यांची चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 5 :30 वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
पानसरे या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाले त्यांना तातडीनं पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वनेश प्रल्हाद  परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 
 
मेहबूब पानसरे हे राष्ट्रवादीचे खासदार आणि कार्याध्यक्ष  सुप्रिया सुळे यांचे  निकटवर्तीय मानले जाते. मेहबूब पानसरे हे जेजुरीचे माजी नगरसेवक आणि प्रसिद्ध व्यापारी होते. त्यांची खंडोबावर अपार भक्ती होती. ते सामाजिक कार्यात अग्रसर होते. 
पानसरे यांचे वनेश परदेशी यांच्या बरोबर शेतीजमिनींबाबत जुने वाद होते. पानसरे 
यांची नाझरे धरण परिसरात शेती आहे. पानसरे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शेतातील मशागतीचे कामाची पाहणी करायला गेले असता त्यांच्यावर पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाड ने वार केले. या हल्ल्यात त्यांच्यासह इतर दोघे जखमी झाले. पानसरे यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी  पोलिसांनी वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 






Edited by - Priya Dixit