1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 7 डिसेंबर 2022 (13:18 IST)

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे लोकसभेत पडसाद, सुप्रिया सुळे आक्रमक

supriya sule
सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावादाचे पडसाद पडले. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाविकास आघाडीतील खासदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
 
सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत यांनी यासंबंधित मुद्दा उपस्थित केला.
 
कर्नाटकचे मुख्यमंत्री बेताल वक्तव्यं करत आहेत, महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली जात आहे, लोकांना मारहाण केली जात आहे, त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने लक्ष द्यावे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
Published By -Smita Joshi 
 
 
महाविकास आघाडीच्या खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली.