1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (23:28 IST)

लालपरीचा प्रवास महागणार, प्रवास भाडे 17 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढते आर्थिक संकट आणि महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे. वाढलेल्या डिझेलच्या किंमती आणि कोरोनामुळे झालेली व्यावसाय हानी लक्षात घेता एसटीचे प्रवास भाडे 17 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लालपरीचा प्रवास महागणार आहे.
 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) प्रवास भाडे वाढविण्याचा विचार करत आहे. वाढलेले डिझेलचे दर, कोरोनामुळे होत असलेलं आर्थिक नुकसान यामुळे महामंडळाने प्रवास भाडे 17 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव महामंडळानं तयार केला आहे.
 
सध्या राज्यात दहा हजार बस धावत असून, दररोज आठ कोटी रुपयांचे उत्पन्न आहे. मात्र इंधन दर वाढ व घटलेली प्रवाशांची संख्या यामुळे महामंडळाला दररोज दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तुर्तास या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही मात्र, लवकरच भाडे वाढ लागू करण्याची शक्यता आहे.