शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:42 IST)

जाऊ द्या हो… कुठं बारक्या बारक्या लेकरांचं आपण मनावर घ्यायचं

Sushma Andhare
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहातच संजय राऊत यांना धमकी दिली आहे. “संजय राऊतांचं संरक्षण १० मिनिटांसाठी काढा, ते परत दिसणार नाहीत” असं विधान नितेश राणे यांनी केलं. नितेश राणेंच्या या विधानाची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. बारक्या बारक्या लेकरांचं मनावर घ्यायचं नाही, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं. त्या वाशिम येथे पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
 
नितेश राणेंच्या विधानाबाबत विचारलं असता सुषमा अंधारे म्हणाल्या, “जाऊ द्या हो… कुठं बारक्या बारक्या लेकरांचं आपण मनावर घ्यायचं. आपण त्यांच्याबद्दल एवढा गंभीर विचार करायचा नाही. लहान लेकरू आहे, बोलत असतंय. आपण त्याचं कौतुक करायचं. आपण लाडाने त्याला थोडंसं चुचकारायचं… गोंजरायचं.”
Edited by : Ratnadeep Ranshoor