रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (13:14 IST)

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मालेगाव – मनमाड रोड चकाचक

eknath shinde
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत आहे. मालेगाव बाह्य,तसेच मनमाड-नांदगाव मतदार संघातील दादा भुसे व सुहास कांदे या आपल्या सोबतच्या आमदारांना बळ देण्यासाठी हा दौरा आहे. नेहमी जिल्ह्याच्या ठिकाणी होणारी उत्तर महाराष्ट्रातील विभागीय बैठक यंदा मालेगाव मध्ये घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री प्रथमच मालेगावमध्ये येणार असल्याने शहराच्या प्रवेशद्वारावर गिरणा पुलावर सध्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. मालेगाव येथील मुख्यमंत्री मनमाड मध्ये येणार असल्याने मुख्य रहदारीचा रस्ता असलेल्या पुलावरील डिव्हायडरवर ही रंग रंगोटी सुरू करण्यात आली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे इतके दिवस अबोध-ढोबड दिसणारे रस्ते मात्र चकाचक झाले आहे.