1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (19:43 IST)

मराठमोळ्या डॉक्टरची कमाल, कोरोनावर उपाय शोधला

कोरोनाने गेल्या अडीच वर्षांपासून उच्छाद मांडला आहे. कोरोनामुळे कित्येक लोक दगावले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊन देखील कोरोनाचा संसर्ग होत आहे. कोरोना पूर्णपणे लस घेऊन देखील बरा होणार की नाही असे कोणीही सांगू शकत नाही. पण देशातील एका डॉक्टरांनी कोरोना पूर्णपणे बरा करण्याचा दावा केला आहे. पदमश्री डॉ.हिंमतराव बावस्कर असे या डॉक्टरांचे नाव आहे. हे रायगडच्या महाड मधील रहिवासी आहे. डॉ. हिंमतराव यांनी आपल्या उपचार पद्धतीने अनेकांना बरं केले आहे.

त्यांनी मेथिलीन ब्लूचा वापर करून रुग्णांना उपचार दिले आहे. मेथिलिन ब्लू हे एका प्रकारचा क्लोराईड सॉल्ट म्हणजे मीठ आहे. हे फार कमी किमतीत सहज उपलब्ध होत. याचा वापर डाय मध्ये केला जातो.या मध्ये अँटीऑक्सीडेंट, अंतिमलेरियल, अँटी डिप्रेसंट आणि कार्डीओप्रेडिक्टिव्ह गुणधर्म असतात. या व्यतिरिक्त, या मध्ये आयवरमेक्टीन, आणि अँटिपेरोसायटीक औषधाचा वापर केला जातो.  मात्र याचा अतिवापर हानिकारक असतो. ह्याचा जास्त वापर केल्यास हे रसायन विषाप्रमाणे काम करत. 
 
त्यांच्या या उपचार पद्धतीला आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये स्थान देखील मिळालं आहे. त्यांनी कोरोनाच्या रुग्णांना मेथिलिन ब्लूचा वास घेण्यास सांगितले आणि या उपचार पद्धतीने रुग्णांना बरे केले. ज्या रुग्णांनी रेमडीसीवीर, फेव्हिपिराविर आणि टॉसिलीझुमॅब सारखी अँटी व्हायरल औषध घेतली होती. तरीही रुग्णांना आराम नव्हता. डॉ बावस्कर यांनी मेथिलिन ब्लू चा वापर करून त्यांना बरे केल्याचे सांगितले. हिंमतराव बावस्कर हे प्रख्यात डॉक्टर आहे. ते विंचू आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तींवर उपचार करतात. त्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमच्या रुग्णांना मेथिलिन ब्लूचा वास घेण्यास सांगून बरं केलं.  

त्यांच्या या कामाचा उल्लेख आणि लेख जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केयर मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यांच्या या रिसर्च जर्नल मध्ये मेथिलिन ब्लूचा वास घेतल्यावर एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. असा दावा केला आहे.