सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (17:54 IST)

मुंबई : रविवारी मेगा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील पुलाच्या देखभाल-दुरुस्तीचे व गर्डर बसविण्याचे काम रविवारी (२० ऑगस्ट) हाती घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. पुण्याहून मुंबईकरीता सकाळी ७.१५ वाजता सुटणार्‍या डेक्कन क्वीन एक्स्प्रेससह मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. 

साडेतीन तासांचा हा ब्लॉक असणार असून डोंबिवली-कल्याण दरम्यान अप व डाऊन मार्गावरील उपनगरीय रेल्वे वाहतूक सकाळी ९.१५ ते दुपारी १२.४५ वाजेदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई सीएसटी एक्स्प्रेस, काकीनाडा पोर्ट- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस कर्जत, पनवेल, दिवा मार्गे वळविण्यात आल्या असून या सर्व रेल्वे १० ते ४० मिनिटे उशिराने धावतील. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.