रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2024 (07:53 IST)

आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, मिरवणुकीत युवकांना मारहाण

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिलेला धमकावून जमिन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत युवकांना मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड हे युवकांना मारत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, बुलढाणा शहरातील ही घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड यांनी बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. विशेष, बाब म्हणजे आमदार संजय गायकवाड मारहाण करत असताना पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
 
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आमदार संजय गायकवाड यांच्यावर जमिन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी राजूर येथील दीड एकर शेतजमीन बळकावल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांच्यावर आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor