शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जानेवारी 2024 (08:48 IST)

३८ मिनिट १४ सेकंदात कळसुबाई शिखर केले सर!

नगर : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसुबाई शिखराची चढाई गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी अवघ्या ३८ मिनिट १४ सेकंदात करून एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
 
कळसूबाई शिखर समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर आहे. पायथ्याशी असणा-या बारी गावातून शिखरांची ऊंची सुमारे ९०० मीटर आहे. येथील कठीण कातळ टप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे शिखर चढाईसाठी गिर्यारोहकांना सर्वसाधारण २ ते ३ तासांचा अवधी लागतो. तानाजी केकरे महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचा प्रमुख गिर्यारोहक आहे.
 
यापूर्वीचा विक्रम बारी येथील गिर्यारोहक साजन भांगरे यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये कळसुबाई शिखर ४२ मिनिटामध्ये सर केल्याची नोंद आहे.