शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (09:13 IST)

MPSCचे आंदोलक विद्यार्थी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबत मोठा निर्णय

विद्यार्थी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबत मोठा निर्णय झाला आहे. बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्यानुसार, पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळातसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी शरद पवार यांनी अचानक आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागेल. मुख्यमंत्र्यांसोबत येत्या दोन दिवसांत बैठक करण्याची जबाबदारी मी घेतो. यावर तोडगा काढायचा असेल, तर सरकारशी बोलावे लागेल. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागेल, असेही शरद पवार म्हणाले होते.
 
दरम्यान, अशक्य काही नाही आपण मार्ग काढू शकतो. हा प्रश्न सोडवायचा असेल तर सरकार आणि मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणे गरजेचे आहे. इथे येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांच्याशी संपर्क केला असता बैठक घेण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मी स्वतः तुमच्याबरोबर असेन. आयोगाचे अधिकारी, विद्यार्थ्यांचे पाच प्रतिनिधी या बैठकीला असतील. तुमच्यावतीने कोण बैठकीला येणार त्यांची नावे द्यावीत, असे शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितले होते. 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor