बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2017 (11:39 IST)

खारेगाव टोल नाक्यावर 13 मेपासून टोलवसुली बंद

मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या भिवंडी बायपासवरील खारेगाव टोल नाक्यावर येत्या 13 मेपासून टोलवसुली बंद होणार आहे.  केंद्र सरकारने 4 जानेवारी 2002 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, 13 मे 2017 पर्यंच या रस्त्यावर टोलवसुलीची परवानगी असल्याचं स्पष्ट केलं होतं. या टोलनाक्यावर वसुलीचं कंत्राट आयडियल रोड बिल्डर्स अर्थात आयआरबी या कंपनीला देण्यात आलं होतं. या रस्त्याच्या देखभालीसाठी आयआरबीला 180.83 कोटींचा खर्च आल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे 1998 पासून या रस्त्याच्या देखभालीसाठी टोलवसुली सुरु झाली. कंपनीने आतापर्यंत 500 कोटींची वसुली केल्याचं सांगितलं आहे. परंतु कंपनीने किमान दोन हजार कोटींची टोलवसुली केल्याची शक्यता माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी व्यक्त केली आहे.