मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (20:45 IST)

विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद नरहरी झिरवाळ यांच्याकडे

काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आता विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद नरहरी झिरवाळ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.नरहरी झिरवळ हे शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. ते नाशिकमधील दिंडोरीचे आमदार आहेत. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी झिरवाळ बेपत्ता झाले होते. काही दिवसांनंतर नरहरी झिरवाळ शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी दिसले, तेव्हा ‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ असं भावनिक उत्तर दिले होते. 
 
शरद पवार साहेब हे माझं दैवत आहेत. त्यांनी मला पाचव्यांदा उमेदवारी दिली. आधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे मी विश्वासघात करणार नाही, असं झिरवाळ म्हणाले होते.