1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 एप्रिल 2023 (10:32 IST)

नाशिक : अग्निवीर भरती प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू

नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर भरती अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. हर्षल संजय ठाकरे (वय २१ वर्ष, आर्मी नं. I ३४५१७४६) असे निधन झालेल्या जवानाचे नाव आहे. 
  
  हर्षल हा मूळ धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून त्याला उलट्या व ताप याचा त्रास झाल्यामुळे आर्टिलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकमधील देवळाली कॅम्प पोलिस पुढील तपास करीत आहेत.  
  
 या प्रकरणी आर्टिलरी सेंटरतर्फे लेखी माहितीद्वारे पोलिसांना कळवण्यात आले आहे. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलिसांनी हर्षल ठाकरे यांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.. हर्षल ठाकरे याला उष्माघाताचा त्रास का झाला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. देवळाली कॅम्प पोलिस पुढील तपास करीत आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे नाशिकमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. आज सकाळी अकरा वाजता संपूर्ण गावात शहीद अग्नीवीर हर्षल संजय मराठे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर पार्थिवावर मोठा भाऊ गौरव मराठे यांनी मुखाग्नी देऊन शासकीय इतामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Edited by - Priya Dixit