सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (20:45 IST)

नाशिकरोड :मालमत्ते साठी सख्खा भाऊ बनला भावाचा वैरी,आरोपी भावाला अटक

murder
नाशिकरोड : राहते घर विकण्याचा आग्रह लहान भावाने केला मात्र मोठा भावाने या गोष्टीस विरोध केल्याने लहान भावाने  मोठया भावाची हत्या केली. उपनगर पोलीस ठण्याच्या हद्दीतील समर्थ रामदास स्वामी नगर, लेन क्रमांक एक येथे आज दुपारी ही घटना घडली.
 
मोठा भाऊ मयत मयंक चंद्रकांत जाधव (वय 34) व त्याचा लहान भाऊ आकाश चंद्रकांत जाधव (वय 32) व त्याची आई असा परिवार आहे. यांचा वडिलोपार्जित फ्लॅट असून तो विकण्याचा आग्रह लहान भाऊ आकाश करीत होता. मोठा भाऊ मयंक त्यास विकण्यास विरोध करीत होता. या वरून या भावामध्ये अनेकदा वाद विवाद झाले.
 
या वादाला कंटाळून यांची आई तिच्या लेकी कडे राहत होती.
आज सकाळ पासून या भावांमध्ये यावरून वाद सुरु होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने लहान भावाने धारदार शस्त्राने मोठा भाऊ मयंक याच्या डोक्यावर, पोटावर हल्ला चढवला. घाव वर्मी लागल्याने मयंक जागीच कोसळला व मयत झाला.
 
या बाबत उपनगर पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब डुकळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व त्यांचे पथक घटनास्थळी पोहचले व पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आकाश जाधव यास ताब्यात घेतले.
 
दोघेही भाऊ अविवाहित होते. सख्खा भाऊ पक्का वैरी या म्हणीचा प्रत्यय यावेळी आला.

Edited by -Ratnadeep Ranshoor