आता सीबीएसइच्या दहावी- बारावी अभ्यासक्रमात नव्या विषयांचा समावेश!
इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. दहावी- बारावी परीक्षांआधीचं मोठी अपडेट येत आहे .इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बदल होणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसई आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक अभ्यासक्रमात काही बदल करणार आहे. या मध्ये इयत्ता दहावी पर्यंत दोन ऐवजी तीन भाषांचा अभ्यास करणं हे अनिवार्य करण्यात आलं आहे. या तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीय असावी तर इयत्ता 11 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना एक ऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. या पैकी एक भाषा भारतीय असेल . हा बदल करण्याचा निर्णय विविध शैक्षणिक संस्था कडून सूचना मागवल्यानन्तर बदल लागू करण्यात येण्याचं शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
आता विद्यार्थ्यांना इयत्ता नववी आणि दहावीच्या स्तरावर उत्तीर्ण होण्यासाठी दहा विषयांचा अभ्यासक्रम लागू होणार या मध्ये सात मुख्य विषय आणि तीन भाषांचा समावेश असेल.त्यापैकी दोन भारतीय भाषा असतील.तर इतर विषयांमध्ये संगणक, गणित, कला शिक्षण, सामाजिक शास्त्र, शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाचा समावेश असेल.
तर इयत्ता 11 वी आणि इयत्ता 12वी मध्ये चार मुख्य विषयांसह दोन भाषांचा समावेश असेल. या पैकी एक भाषा भारतीय असेल .