गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (14:51 IST)

महाराष्ट्रात उद्योग प्रकल्प येण्याकरता वेटिंग लिस्टवर, राणे यांचा दावा

rane
महाराष्ट्रात उद्योग प्रकल्प येण्याकरता वेटिंग लिस्टवर असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. कालपर्यंत जे सत्तेवर होते, ते राज्यामध्ये उद्योग आणू शकले नाहीत, ते आता टिका करत आहेत. प्रकल्प गेले तसे येतील. महाराष्ट्र आणि मुंबईत उद्योग वेटिंग लिस्टवर आहेत. उद्योग महाराष्ट्रात यावेत याकरता पोषक वातावरण या नव्या सरकारकडून निर्माण केलं जाईल, असा माझा विश्वास आहे, असं नारायण राणे म्हणाले.
 
नोटाबंदीमुळे रोजगार तयार करायला किंवा उद्योग यायला काहीही बंधने आलेली नाहीत असंही नारायण राणे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांकडून केली जातेय. त्यांच्या या मागणीला नारायण राणेंनी विरोध केला आहे. नारायण राणे म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर न करता मदत मिळतेय. 
Edited by : Ratnadeep Ranshoor