नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच सेनेचं नुकसान केलं-केसरकर
पक्ष नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच शिवसेनेचं नुकसान केलं. अनेक गोष्टी संजय राऊतांना माहित नसतात. ते स्वत:ला खूप जवळचे समजतात अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केली. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला होता त्याला त्यांनी प्रत्यूत्तर दिले. आज माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आधी जखम द्यायची आणि नंतर मलम लावण्याचा सल्ला देणाऱ्यांनीच शिवसेनेचं नुकसान केलं. सुरवातीला एकनाथ शिंदे (यांना गटनेते पदावरून काढलं. त्यानंतर तुम्ही नार्वेकरांना पाठवलं. तसेच खासदार भावना गवळी यांना कार्यकरणीतून काढण्यावर आक्षेप घेत त्यांनी तुमचा झेंडा पाचवेळा उंचावल्याचं म्हटलं.