1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (23:43 IST)

राज्यात या ठिकाणी ऑरेंज अलर्ट

Orange Alert at this location  IMD
IMD ने महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे साठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना विशेष खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. 
 
IMD ने कर्नाटक, कोकण, गोवा, केरळ, लक्षद्वीपमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी येथे पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.