शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (21:01 IST)

आमचा प्रमुख विरोधक भाजप,तो तोडण्याचे काम करत आहे :नाना पटोले

nana patole
आम्ही मित्र घेऊन चालणारी लोक असून मित्रांना दगा देणारे नाही. तसेच आम्ही जोडण्याचे काम करत असून आमचा प्रमुख विरोधक असलेला भाजपपक्ष तोडण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी केले आहे. पटोले नाशिक येथे आझादी गौरव यात्रेच्या निमित्ताने आले असता माध्यमांशी संवाद साधला.
 
नाना पटोले म्हणाले,. मला पंकजा ताई यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पटोले मुंबई भाजप अध्यक्षांबद्दल सांगितलं की, टीव्हीवर वेगवेगळ्या अध्यक्ष नावांची चर्चा चालू आहे. कोण होत, काय होत ते बघू. कुणाला आताच का शुभेच्छा द्यायच्या. नाना पटोले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हणाले, आमचे मित्र एकनाथ शिंदे हे सभ्य आहे. पण असर दुसऱ्याचा लागला आहे. त्यामुळे दम द्यायची सवय तिकडून लागली. त्यांची महाशक्ती जी दिल्लीला बसली आहे. त्यांनी गुवाहाटी येथे सांगितलं होतं. त्या महाशक्तीचा असर त्यांच्याकडे आला, असं मला वाटतं.
 
यावेळी बोलतांना ते म्हणाले, भारतीय जनता पक्षापासून बिहारमध्ये नितीशकुमार  बाजूला झाले. भाजप पक्षापासून लोक दूर होत चालले आहेत. कॉंग्रेस समवेत जोडलेली लोक आजही पक्षासमवेत असून काँग्रेस हा जनतेतला पक्ष असल्याने निश्चितपणे काँग्रेस सोबत जनता आहे असे पटोले म्हणाले.