मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:17 IST)

मोदींच्या भाषणावर राजकीय टीकास्त्र

supriya sule
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं, यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी गुजरातमधून 1033 ट्रेन्स तर महाराष्ट्रातून 817 ट्रेन्स आणि पंजाबमधून 430 ट्रेन्स सोडल्याचा रेल्वे मंत्रालयाचा डेटा माध्यमांसमोर ठेवला. 
 
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटलं आहे. तसेच मोदी भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत, असा टोलाही सुप्रीया सुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे. 
 
 दीड तासांचं पंतप्रधानांचं भाषण झालं त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या की खूप अपेक्षेनं मी त्या भाषणाकडे पाहत होते. कारण खूप अडचणीच्या काळातून आपला देश चालला आहे. महामारीतून संपूर्ण जग हळूहळू बाहेर पडतंय. त्यामुळे माननिय पंतप्रधानांनी आपल्या सर्वांना एक दिशा द्यावी, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैव की, आपल्या महाराष्ट्राबाबत पंतप्रधान जे बोलले ते दुर्दैवी. मला स्वतःला वैयक्तिकपणे दुःख देणारी गोष्ट. ज्या राज्यानं फुल न फुलाची पाकळी म्हणा. पण 18 खासदार भाजपला महाराष्ट्रानं निवडून दिले आहेत. हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ते भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत.