रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कुलकर्णीला यांच्या पोलिस कोठडीसाठी न्यायालयात अर्ज

बेकायदा शस्त्रसाठ्याप्रकरणी पोलिसांनी भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णीला अटक केलीय. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यानं आता पोलिसांनी पुन्हा पोलिस कोठडीसाठी न्यायालयात अर्ज केला आहे. डोंबिवलीतल्या धनंजय कुलकर्णीच्या हाऊस ऑफ फॅशन या दुकानात शस्त्रसाठा सापडला होता. हा शस्त्रसाठा विध्वंस घडवण्यासाठी आणला होता का, असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडलेला असतानाच नवा वाद निर्माण झाला आहे. 
 
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांवर दबाव येत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.  कुलकर्णीला पोलिसांनी जेव्हा कोर्टात हजर केले तेव्हा पोलिसांना त्याच्या चौकशीसाठी कोठडीही मागावीशी वाटली नाही. कोर्टाने कुलकर्णीला न्यायालयीन कोठडीत पाठवले असून त्याला लवकरच जामीन मिळण्याची शक्यता आहे. .