शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 जून 2017 (11:53 IST)

अहमदनगर : एक कोटींचा गांजा जप्त

अहमदनगरमध्ये पोलिसांनी  एक कोटींचा गांजा जप्त केला आहे. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर पेट्रोलिंग करताना अहमदनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. औरंगाबादकडून नगरच्या दिशेने ईनोव्हो आणि बोलेरो कार भरदाव वेगाने येत होती. त्यावेळी पोलीसांनी त्यांना थांबवण्याचा ईशारा केला. मात्र दोन्ही गाड्या न थांबताच शहरात आल्या. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन गाड्यांची तपासणी केली. यावेळी ईनोव्हो गाडीत एक पुरुष, तर बोलेरो गाडीत एक महिला आणि पुरूष गांजा घेऊन जात होते. गाडीत एक कोटींपेक्षा जास्त किंमतीचा गांजा सापडला आहे.  या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी गांजा ताब्यात घेतला आहे.