शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (07:42 IST)

सैन्य भरती परीक्षेचा पेपर फुटला होता त्यावर पोलिसांनी केलीमोठी कारवाई

28 फेब्रुवारी रोजी सैन्यभरतीसाठी देशभरात परीक्षा होणार होती. मात्र, सैन्य भरतीचे पेपर आदल्या दिवशी फुटणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी छापेमारी केली. त्यांनी दोन ठिकाणी समांतर कारवाई केल्यानंतर, विश्रांतवाडी पोलिसांनी पोलिस ठाण्यात आतापर्यंत एकूण 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
सैन्य भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी राज्यात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी या पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पुण्यातील बारामती येथेून एकाला अटक करण्यात आली आहे. तर अचानक पेपर फुटल्यामुळे देशभरात होणाऱ्या सैन्य भरतीचा पेपर सरकारला रद्द करावा लागला आहे.
 
पोलिसांनी सापळा रचून गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन ठिकाणी चौकशी केली आणि एकूण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सेवानिवृत्त अधिकऱ्याच्या मुलाने याबाबत तक्रार दिली होती. पेपर होण्याच्या आदल्या दिवशी पेपर फोडून ते उमेदवारांना पुरवणार असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एकूण 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.