दाऊदच्या नातेवाईकाचा लग्नसोहळ्यात पोलिस आणि राजकारणी मंत्रींची हजेरी
नाशिकमध्ये कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचा लग्नसोहळा नुकताच पार पडला आहे. मात्र यात कहर झाला आहे. या विवादित असलेल्या कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे आमदार, महापौर यांच्यासह नाशिकमधले सर्वपक्षीय नेतेही उपस्थित होते. त्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त होत आहे.
पूर्ण नाशिक सह राज्यात हा विषय चर्चेचा विषय झाला आहे. या लागंत अनेक नामचीन गुंड, बुकी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलेही या लग्नात सहभागी झाले होते अशी चर्चा आहे. नाशिकमधले ८ पोलीस अधिकारी कर्मचा-यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती. त्या संबंधीतांच्या चौकशीचे आदेश, नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. एका बाजूला चांगल्या वागणुकीचे धडे द्यायचे आणि दुसरीकडे पुन्हा तेच वागून समाजात एक चुकाचा संदेश द्यायचा असे चित्र निर्माण झाले आहे. या लग्नाला उपस्थित राहिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून, हे कितपत योग्य आहे असे नागरिक विचारात आहेत.