शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (21:25 IST)

कोल्हापुरात देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा ;"भ्रष्टाचार्‍यांना उत्तर द्या !

devendra fadnavis
कोल्हापुरात माजी मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी 9 एप्रिल रोजी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी महाराष्ट्रात सरकार नाही, केवळ भ्रष्टाचार असे म्हटले. या भ्रष्टाचाराला उत्तर द्या.
महाराष्ट्रात प्रजेला लुटण्याचा कार्य केले जात आहे. प्राण गेला तरी बेहत्तर भ्रष्टाचाऱ्यांना देऊ भगवं उत्तर असा हल्लाबोल त्यांनी केला. भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. या वेळी फडणवीस यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सत्यजित कदम म्हणजे भाजपला विजयी करण्याचं आवाहन केले आहे. सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची रणधुमाळी वेगानं सुरु आहे.