रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (11:24 IST)

राज्यात काही ठिकाणी पाऊस, तर दुसरीकडे उष्णतेची लाट

rain and hot
महाराष्ट्रात आणखी दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम असण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेची लाट असल्याने पुढचे दोन दिवस तरी महाराष्ट्रात तापमानवाढ कायम राहिल असे दिसते.
 
दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात मात्र पावसाळी वातावरण आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
 
सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत रविवारीअवकाळी पावसाने हजेरी लावली. तसंच सोमवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
विदर्भात कमाल तापमान 41 अंशावर आहे तर रविवारी अकोल्यात राज्यातील उच्चांक असे 43. 9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातही तापमान 40 अंशाच्या पुढे आहे.