गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (15:54 IST)

राज्यसभेचं तिकीट कुणाला?

uddhav sanjay sambhaji raje
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठीचे कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार?, याबाबत सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुणाला संधी देणार, याबद्दल राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होतीये. अशातच शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. संजय राऊत 26 मे रोजी आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आतापर्यंत सलग तीन वेळा राऊतांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. निवड पात्र झाल्यास राऊतांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाण्याचा मान मिळणार आहे.
 
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंनी (Sambhaji Raje)अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. तर शिवसेनेने सुद्धा या जागेवर आपला उमेदवार देण्याचं म्हटलं आहे. यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीत संभाजीराजेंना शिवसेनेकडून सहाव्या जागेवर उमेदवारीची ऑफर देण्यात आली. त्यानंतर आज मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत काय झालं? याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
शिवसेनेचीच आहे सहावी जागा 
वर्षा निवासस्थानी बैठक झाल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं, उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो पक्ष पुढे नेईन. केवळ राज्यसभा निवडणुकीच्या विषयावरच चर्चा झाली असं नाही इतरही विषयांवर चर्चा झाली. काही आमदार सुद्धा उपस्थित होते. मराठा संघटनांचं म्हणणं आहे आणि छत्रपती संभाजीराजे यांचंही काही म्हणणं आहे आणि शिवसेनेचाही एक मुद्दा आहे. आमच्या सर्वांचं म्हणणं आहे, उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की, सहावी जागा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरुन लढेल आणि विजयी होईल.