शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :चंद्रपुर , शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (12:51 IST)

तलावाच्या खोदकामात आढळलं पंचमुखी शिवलिंग

panchmukhi shivling
भेजगावातील तलावाच्या खोदकामात दुर्मिळ पंचमुखी शिवलिंगाचे शिल्प आढळून आले. जिल्ह्यात पंचमुखी शिवलींग शिल्प सापडण्याची ही पहीलीच वेळ आहे. शिल्प तलावाच्या काठावर असलेल्या हेमांडपंतीय मंदीराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आले आहे. आठवडाभरापुर्वी या तलावात यमदेवाचं शिल्प आढळून आलं होतं. पंचमुखी शिवलींग सापडल्याने चंद्रपूरचा इतिहासात अधिक भर पडली आहे. चंद्रपूर (जिल्ह्यात येणाऱ्या मुल तालुक्यातील भेजगाव येथिल प्राचीन तलावाचं खोदकाम सूरू आहे. या तलावाच्या पाळूवर देखणे हेमाडपंथीय शिवमंदीर आहे. मागील काही दिवसांपासून या तलावाच्या खोलिकरणाचं काम सूरू आहे.
 
आठवडाभरापुर्वीच याठिकाणी यमदेवाचं शिल्प मिळालं होतं. बुधवारी खोदकामादरम्यान दुर्मिळ समजल्या जाणारे पंचमुखी शिवलींगाचे शिल्प सापडले आहे. हे शिल्प अतिशय देखणे असून, टेराकोटाने बनविलेल्या या शिल्पावर लाल रंगाची पॉलीश केलेली आहे. शिल्प पाच इंचाचं आहे. असं हे छोटेखाणी शिल्प पुजाअर्चेसाठी घरातील देवघरात ठेवल्या जात असल्याचं सांगितलं जातं.
 
पंचमुखी शिवलींगावर भगवान शिवाचे पाच शिल्प कोरले असतात. शिवाचे पश्चिम मुख हे पृथ्वी तत्त्व म्हणून पुजले जाते. त्याचे उत्तर मुख हे जल तत्त्व, दक्षिण मुख हे तेजस तत्त्व आणि पूर्व मुख हे वायु तत्त्व म्हणून पुजले जाते. भगवान शिवाचे वरचे मुख हे आकाश तत्त्व म्हणून पुजले जाते, असे अभ्यासक अरूण झगडकर यांनी सांगितले.