रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 21 जुलै 2024 (15:26 IST)

रायगडमध्ये रेड अलर्ट, रत्नागिरीतही अतिवृष्टीचा इशारा

सध्या राज्यात मान्सून सक्रिय आहे. राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी इमारती कोसल्याच्या घटना समोर आल्या आहे. येत्या दोन दिवस देखील राज्यात पाऊसाने जनतेला दिलासा मिळणार नाही. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज ओडिशा, छत्तीसगडच्या दिशेने सरकणार आहे. अशा परिस्थितीत राज्यातील विविध भागात हवामान खात्यानं अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरीला धोका सांगण्यात आला आहे. 

हवामान खात्यानं येत्या 24 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रायगड मध्ये 21 ते 23 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीत 21 आणि 22 जुलै रोजी रेड अलर्ट सांगण्यात आला आहे. 
22 जुलै रोजी सिन्धुदुर्गात रेड अलर्ट सांगितलं आहे.तर इतर ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. 
 
Edited by - Priya Dixit