मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (15:56 IST)

संजय राऊत अमेरिकेचीही निवडणूक लढवतील,चंद्रकांत पाटील यांचा टोला

शिवसेनेची मुंबईत ताकद असेल तर संजय राऊत यांनी मुंबईतील एका सुरक्षित जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी असे थेच आव्हान चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना दिलं आहे.तसेच संजय राऊत अमेरिकेचीही निवडणूक लढवतील असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
 
भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी भाजप – मनसे युती करुन दाखवावी असे म्हटलं आहे. यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे. “जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर, मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेची मुंबईत तर ताकद उरली असेल तर एक सुरक्षित जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी असं चॅलेंज चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. मराठीत म्हण आहे.. दंड थोपटणे, संजय राऊतांनी दंड चेक करावा आणि आपली क्षमताही तपासावी असा खोचक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर टीका करत म्हटलंय की, संजय राऊत अमेरिकेचीही निवडणूक लढवतील, असं बोलताच एकच हशा पिकला होता.