शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जुलै 2020 (14:11 IST)

लॉकडाउनमध्ये बाळासाहेबांची आठवण अधिक आली त्याचे मुख्य कारण हे आहे : शरद पवार

करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये बाळासाहेबांची एका गोष्टीसाठी बाळासाहेबांची आठवण नक्की आली असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे पवार यांची मुलाखत घेतली, या मुलखतीत लॉकडाउन, राजकारण, ठाकरे कुटुंब, महाविकास आघाडी यासारख्या अनेक विषयांवर पवारांनी भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी बाळासाहेबांची लॉकडाउनदरम्यान मला एका खास गोष्टीसाठी आठवण झाल्याचं मत मांडलं.
दिवस दिवस त्यांनी घरात घालवले आहेत. पण ते दिवस घालवताना त्या परिस्थितीला सहकाऱ्यांनाबरोबर घेऊन त्यांना प्रोत्साहित करुन संकटाला कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी नक्कीच शिकवलं होतं. म्हणून या दोन महिन्यांमध्ये बाळासाहेबांची आठवण होते,” असं पवारांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

“आपण घराच्या तर बाहेर पडायचं नाही. पण ज्या गोष्टींच्या दिशेने आपल्याला जायचयं त्या दिशेने जाण्याच्या प्रवासाची आपण तयारी केली पाहिजे. ते बाळासाहेब करायचे आणि त्याची आठवण या कालावधीमध्ये मला अधिक झाली,” अशा शब्दांमध्ये पवारांनी (NCP sharad Pawar)  बाळासाहेबांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

मुलाखतीमध्ये अनेक ठिकाणी पावरांनी बाळासाहेबांचा संदर्भ दिल्याचे पहायला मिळालं.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. बाळासाहेब हे सत्तेमागील प्रमुख व्यक्तीमत्व होतं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून त्यांना प्रत्यक्ष कारभार चालवायचा असल्याचे हा फरक असणे स्वाभाविक असल्याचेही पवारांनी म्हटलं आहे. “मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्यानुसार निर्णय ते घेतात. मात्र अंत्यंत सावकाश, काळजी घेऊन, हळूहळू, निर्यणाचे दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा करुन मगच ते निर्णय घेतात,” असं पवारांनी मुलाखतीमध्ये सांगितलं. मात्र त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सर्व निर्यणांना माझा पाठिंबा आहे असंही स्पष्ट केलं.