शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 मार्च 2017 (15:22 IST)

सामनातून पुन्हा भाजपावर जहरी टीका

एका बाजूला मुंबईत युतीचा तिढा कायम असून, शिवसेना आपला महापौर करणार आहे. मात्र अश्या वेळी   मुख्यमंत्री युतीसाठी  प्रयत्न करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे सामनामधून  सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.सामनाने राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या मुद्दा केला असून सरकारला धारेवर धरले आहे.  हे बळीराजाचं सरकार नाही, ‘बळी’ घेणाऱ्यांचं सरकार आहे, टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयमधून केली आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच होतायेत, सुचवण्यात आलं आहे.
 
राज्यातील भाजप सरकार जलसिंचनासह अनेक कामांच्या गमजा नेहमीच मारीत असते. आताही जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्या पक्षाने त्या विषयी स्व-कौतुकाचे ढोल यथेच्छ पिटले, पण मग तरीही मराठवाड्यात दिवसाला दोन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ का आली, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारलाच द्यावं लागेल, असंही ते म्हणालेत. त्यामुळे युती होणे सध्या तरी अवघड आहे.