गुरूवार, 29 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (23:25 IST)

जालन्यात SRPF जवानाचा स्वत: वर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न

जालनात SRPF च्या गट क्रमांक 3 च्या एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल दशरथ गाढवे (35) असे या जवानाचे नाव असून आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी स्वतःवर स्वतःच्या हातात असलेल्या बंदुकीने स्वतःचा गळ्यावर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ही घटना आज सायंकाळी घडली. त्यांनी मानसिक तणावामुळे असं केल्याचे समजले आहे. काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते. त्यांची पत्नी देखील त्यांना सोडून माहेरी गेली आणि ते कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेची माहिती मिळतातच सदर बाजारचे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली आणि  नंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले ते या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.