शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (10:55 IST)

महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवा

महाराष्ट्रामध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर मराठी नंबर प्लेट लावल्याने होत असणारी कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. राजू पाटील यांनी यासंदर्भातील एक पत्रच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पाठवलं आहे. यासंदर्भात राजू पाटील यांनीच सोशल नेटवर्किंगवर पत्राचा फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे. 
 
मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी. मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर तातडीने तसा कायदा करुन परवानगी द्यावी व महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी, असं या पत्रामध्ये राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
 
राजू पाटील यांनी  परिवहन मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये हे पत्र महाराष्ट्रात गाड्यांना लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील नंबर प्लेटवर सुरु असलेली कारवाई तत्काळ थांबविण्याबाबत असल्याचं म्हटलं आहे. “महाराष्ट्रात विविध गाड्यांवर मराठी भाषेत नंबर प्लेट लावलेल्या आहेत. सदर गाड्यांवर आरटीओकडून कारवाई करुन दंड वसुली करण्यात येत आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेतील नंबर प्लेटवर कारवाई होत असल्याने मराठी जनांमध्ये तीव्र नाराजी परसरली आहे,” असं राजू पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.