रविवार, 2 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (21:29 IST)

राज्यपालांच्या विमानात तांत्रिक अडचण, त्यांच्या जीवाची आम्हाला काळजी - नाना पटोले

Congress state president Nana Patole gave an explanation
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्र सरकारचं चार्टर प्लेन दिलं नसल्यावरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
 
राज्यपाल कोश्यारी बसणार असलेल्या विमानात तांत्रित अडचण होती. त्यामुळे त्यांना विमानात बसवण्यात आलं नाही. ते विमानात बसलेच नसल्याने त्यांना उतरवण्याचा प्रश्नच येत नाही, असं पटोले म्हणाले.
 
दरम्यान, देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांची संख्या यांच्यापेक्षा जास्त होती, त्यांनाही पायउतार व्हावं लागलं, त्यामुळं केंद्रातील सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं.