1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (21:59 IST)

मुख्यमंत्र्यानी लॉक डाऊन बाबत सूचक व्यक्तव्य केले

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणाला बघून आज नवीन प्रकरणे सामोरं आली आहेत, कोरोनाच्या स्थितीचे गांभीर्याला घेऊन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करून आज आपली या बाबतची भूमिका स्पष्ट केली.
त्यांनी आज दूरदृष्यं प्रणाली ने  मॉल्स,हॉटेल्स च्या प्रतिनिधींशी बैठक केली. या बैठकीत त्यांनी कोविडच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी सहयोग करावे असे आवाहन केले आहे. त्यांनी सुतवाक्य दिले की आम्हाला कठोर निर्णय घेण्यासाठी बाध्य करू नये. त्यासाठी त्यांनी नागरिकांना सामाजिक अंतर राखणे,मास्क लावून कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला सांगितले आहे.
त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत बोलताना जनतेला विनवणी केली आहे की कोरोनाची ही दुसरी लाट भयंकर असून ब्राझील सारख्या देशात उच्छाद मांडले आहे. ब्राझील सारखी अवस्था  सारखी अवस्था महाराष्ट्रात  होऊ नये या साठी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन त्यांनी नागरिकांना दिले. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यावर लॉक डाऊन लावावेच लागतील या शिवाय पर्याय नसेल. त्यासाठी नागरिकांनी नियमांना पाळावे. मास्क वापरावे,सामाजिक अंतर राखणे, आवश्यक आहे.